पुण्यातील शिवाजीनगर येथे दुधाचा टँकर पलटी, हजारो लीटर दूध वाया

पुणे, ५ ऑगस्ट २०२३ : पुण्यातील शिवाजीनगर येथील राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुधाचा टँकर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुध आणि ऑईल सांडले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिवाजीनगर येथील राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर दुध आणि ऑईल मोठ्या प्रमाणावर सांडलयामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर ऑईल पसरल्यामुळे नागरिकांना सदयस्थितीत वाहने चालविताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडून टँकर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा