पुणे: १३ फेब्रुवारी २०२३ : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथे बॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील गुगलच्या कार्यालयात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धामकीचा कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठलीही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही, त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीने स्वतःच नाव पणयम बाबू शिवानंद सांगून हैदराबाद येथून बोलत असल्याचे सांगितले होते. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५ (१) (ब) व ५०६ (२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही व्यक्ती दारूच्या नशेत होती आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.