गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

मुंबई , ६ ऑक्टोंबर २०२२: मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला आणखी एक बॉम्बची धमकी मिळालीय. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने अंबानी कुटुंबातील काही सदस्यांची नावं घेऊन त्यांना शिवीगाळ केली. हा कॉल आज सकाळी १२.५७ वाजता आला. तेव्हापासून हॉस्पिटल आणि अँटिलियाची (मुकेश अंबानींचं घर) सुरक्षा वाढवण्यात आलीय.

डीसीपी नीलोत्पल यांनी सांगितलं की, मुंबईतील डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

याआधीही अंबानी कुटुंबाला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. १५ ऑगस्टलाही एका व्यक्तीनं मुकेश आणि नीता अंबानी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version