नवी दिल्ली, २१ जानेवारी २०२३ : रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर प्रवासादरम्यान, वैमानिकाला सुरक्षेसंबंधित अलर्ट जारी करण्यात आला असून, हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. या फ्लाइटमध्ये २ मुले, ७ क्रू मेंबर्ससह एकूण २४० प्रवासी आहेत. हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात अंदाजे दोन लहान मुलांसह २४० प्रवाशी प्रवास करत होते. अजूर एअर लाईनचे हे विमान रिशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याकडे निघाले होते. डाबोलिम विमानतळ संचालकांना रात्री १२.३० वाजता विमानात बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल मिळाला. त्यानंतर गोव्याकडे निघालेले विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. दरम्यान, गोवा विमानतळावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.