मैत्रीच्या नावाखाली चीन कडून पाकिस्तानला धोका

पाकिस्तान, दि. २१ मे २०२०: चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही घनिष्ठ मित्र आहेत असे सर्व जग मानते आणि पाकिस्तान नेहमीच तो दावा करत आला आहे. परंतू चीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर चीन नेहमीच पाकिस्तानला मैत्रीच्या नावाखाली फसवत आला आहे. चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये ६२ अब्ज डॉलर्सच्या खर्चाने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नफा कमाविण्यात गुंतल्या आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी वीज-वाढत्या किंमतीची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती, ज्याने आपल्या अहवालात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत चीनी कंपन्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. सीपीईसीमधील पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

पाकिस्तानच्या ‘पॉवर सेक्टर ऑडिट कमिटी, सर्क्युलर डेबट रिझर्वेशन अँड फ्यूचर रोडमॅप’ने २७८ पानांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की वीज निर्मितीच्या क्षेत्रात अनियमिततेमुळे १०० अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपये) तोटा झाला आहे. यापैकी एक तृतीयांश तोटा चीनी प्रकल्पात झाला आहे.

मिडिया रोपच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानच्या या समितीने आपल्या रिपोर्टच्या साह्याने असा खुलासा केला आहे की सीईपीईसी अंतर्गत हूणग शेडोंग रुई एनर्जी (एचएसआर) आणि कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी लिमिटेड कोळसा प्रकल्पांनी आपला खर्च खूपच जास्त ठेवला. समितीच्या अहवालानुसार, चीनमधील कोळशावर आधारीत दोन प्रकल्पांसाठी सुमारे ३२.४६ अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपये) च्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली.

मिडिया रिपोर्टनुसार, १६ चिनी वीज उत्पादक कंपन्यांनी ६० अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आणि गेल्या दोन-तीन वर्षात ४०० अब्ज रुपयांचा नफा कमावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा