ज्ञानवापी खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश रवी दिवाकर यांना धमकीचे पत्र

नवी दिल्ली, 8 जून 2022: दिवाणी न्यायाधीश रवी दिवाकर यांना यापूर्वीच ज्ञानवापी प्रकरणात जीवाला धोका असल्याचं धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या पत्रात त्यांना मूर्तिपूजक काफिर म्हणत धमकी दिली जात आहे. पत्र प्राप्त झाल्यानंतर मुख्य सचिव गृह यांच्याकडून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आता हे पत्र रवी दिवाकर यांना मिळणे महत्त्वाचे आहे कारण ते ज्ञानवापी खटल्याची सुनावणी करत आहेत. त्यांनी ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णयही दिला होता. अशा परिस्थितीत त्यांचं नाव कायम चर्चेत असते. त्यावेळीही सर्वेक्षणाचा निकाल देताना दिवाणी न्यायाधीशांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. साध्या प्रकरणांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. भीती इतकी आहे की मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस आयुक्त वाराणसी म्हणाले की, रवी कुमार दिवाकर यांना आधीच घरापासून कार्यालयापर्यंत सुरक्षा देण्यात आली आहे. 9 पोलीस आहेत, रवी कुमार दिवाकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत तैनात आहेत. जिल्हा न्यायाधीशांना यापूर्वीच 10 पोलिसांची सुरक्षा देण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

सध्या याप्रकरणी शिवलिंग असलेला परिसर सील करण्यात आलाय. अनेक प्रसंगी हिंदू बाजूने तेथे पूजा करण्यासाठी परवानगी मागितली आहे, परंतु न्यायालयाने ती परवानगी दिलेली नाही. अलीकडे स्वामी अविमुक्तेश्वरानंदही ज्ञानवापीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना तेथे जाऊ दिलं नाही. त्यावेळी अविमुक्तेश्वरानंद 71 जणांसह श्री विद्यामठमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलंय. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते. काही श्रद्धेची केंद्रे असू शकतात, पण प्रत्येक मुद्द्यावर भांडण का, वाद वाढवायचे का?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा