गोल पोस्ट इतर राजकारण शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे फोन…

शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे फोन…

मुंबई, ७ सप्टेंबर २०२०: गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान मातोश्रीला D कंपनी कडून  बाँम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. तर त्यातच आता महाराष्ट्रातील जेष्ठ आणि राष्ट्रवादीच्या सर्व्हेसर्वा नेत्याला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याचे वृत्त समोर आले. रविवारी पवारांच्या निवास्थानी सिल्वर ओक वर हा फोन आला. तसेच हा फोन भारताबाहेरुन आल्याची माहिती मिळत आहे. ही धमकी जीवे मारण्याची आहे, की खंडणीबाबत हे अजून समजू शकलेले नाही. शिवाय कंगना रनौत प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आल्याचे समजत आहे.

सध्या महाराष्ट्रात कंगना आणि सरकार मध्ये चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आसतानाच, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाष्ट्रातील राजकारणाचे तख्त पलटवणारे राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा यांना धमकीमुळे आता राज्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version