गोल पोस्ट आरोग्य पुरंदरच्या सासवड येथील तिघे कोरोना पॉझिटिव्ह

पुरंदरच्या सासवड येथील तिघे कोरोना पॉझिटिव्ह

पुरंदर, दि. २३ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात दोन रुग्ण तर काल एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर आज सकाळी पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले आहे.

सासवड येथील कोरोना लक्षण असलेल्या तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. पुरंदरतालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. तर सासवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची लक्षणीय संख्या असल्याने सासवडकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

मागील काळात तहसील कचेरीत एका कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मागील दोन दिवसात त्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे व त्या कर्मचाऱ्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ही समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version