वाई न्यायालय परिसरात तीन गुंडावर गोळीबार

वाई, सातारा ७ ऑगस्ट २०२३ : कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर वाई न्यायालय परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाई मेणवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालयात गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी दोन फायर करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा