हिंगोली, ११ फेब्रुवारी २०२४ : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे बटवाडी येथे दुपारी एक ते दोन दरम्यान तीन घराला अचानक आग लागून सुमारे पाच लाखाच्या वर नुकसान झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही, मात्र यामध्ये संसार उपयोगी वस्तू, घरातील धान्य असे एकूण पाच लाखाच्या वर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकलेले नाही. या आगीमध्ये कळणू मोरे, दिनकर मोरे, हिंमत मोरे यांच्या घरांचे नुकसान झाले असुन गावातील नागरिकांनी वेळीच दखल घेऊन आग आटोक्यात आणयाचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. पोलीस प्रशासनाकडून घटना स्थळी भेट देऊन आगीची सविस्तर माहिती घेतली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रभू नांगरे









































