श्रीगणेश मुर्ती उद्योगातून महिलांनी कमावले तीन लाख चाळीस हजार रुपये

लातूर, २२ ऑगस्ट २०२०: मौजे जवळगा तालुका देवणी येथील महादेव स्‍वयंसहाय्यता समुह आणि ओंकारेश्‍वर स्‍वयंसहाय्यता समुहानी एकत्र येवून १६ महिलांच्‍या कुशल कारागीरीतून २००० मुर्ती दोन फुटापर्यंत व २० हजार मुर्ती चार फुटापर्यंत बनवून त्‍याची विक्री केली. यामध्‍ये संबंधीतानी १,१०,०००/- रुपयांची गुंतवणूक करुन रुपये ४,५०,०००/- रुपयांचा व्‍यवसाय पूर्ण करुन ३,४०,०००/- रुपयांचा नफा कमाविला आहे.

यामध्‍ये संबंधीतानी तयार केलेल्‍या मुर्तीची खरेदी जिल्‍हा स्‍तरावर मा. अभिनव गोयल, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री. संतोष जोशी, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी तसेच श्री. जवळगेकर, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी यांनी १,०००/- रुपयांच्‍या श्रीगणेशाच्‍या मुर्ती करुन सदरील महिला गटांना प्रोत्‍साहन देवून त्‍यांच्‍या कौश्‍यल्‍या‍धारीत उपक्रमाचे कौतूक केले. संबंधीत समुहांतील महिलांनी मातीची भांडी, शाडूच्‍या मुर्ती, काचेच्‍या आवरणातील भेट वस्‍तु, लक्ष्‍मीचे मुखवटे, हात, तसेच उत्‍कृष्‍ट प्रकारचे कापडी मास्‍क निमिर्ती करुन उपजिवीकेची साधने तयार केलेली आहेत.

मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी कुशल कारागिरीबद्दल सखोल माहिती घेवून अशा समुहांनी तयार केलेल्‍या साहित्‍याचे विपणण ऑनलाईन होण्‍याबाबत आश्वासित केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा