लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी राजौरीत अटक…

जम्मू-काश्मीर, १९ सप्टेंबर २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य आणि सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई सुरूच आहे. सुरक्षा दलाच्या दक्षतेमुळं दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रांचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात बसलेले दहशतवादी खोऱ्यात उपस्थित दहशतवाद्यांना शस्त्रे देण्यासाठी विविध प्रकारची युक्ती अवलंब करीत आहेत. काश्मीर खोऱ्यात ड्रोनमधून शस्त्रे सोडल्याची घटना समोर आली. या संदर्भात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या तीन संशयितांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला अाहे . हे तिघेही दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील आहेत आणि त्यांची ओळख राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस वानी अशी आहे.

शस्त्रे जप्त केली

हे दहशतवादी पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पाठविलेले शस्त्रे घेण्यासाठी राजौरी येथे गेले होते, असं पोलिसांनी सांगितलं. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, तिन्ही अतिरेकी लष्कर-ए-तैयबाचे आहेत. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये दोन एके -५६ रायफल्स, १८० राऊंड असलेली ६ एके-मॅगझिन्स, दोन चिनी पिस्तुल, ३० राऊंड सह असलेली तीन पिस्तूल मॅगझिन्स, चार ग्रेनेड यांचा समावेश आहे. याशिवाय १ लाख रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

शुक्रवारी रात्री हे शस्त्रे ड्रोनने खाली टाकल्याचे पोलिसांनी सांगितलं. संशयितांकडून एक लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आलीय. ड्रोनमधून शस्त्रे सोडण्याच्या या घटनेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना सतर्क करण्यात आलं आहे.

एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं की, अलिकडच्या काळात अशा ८ घटना आमच्या लक्षात आल्या आहेत. कठुआमध्ये बीएसएफनं एक ड्रोन पडला होता. जवाहर बोगद्याजवळ तीन ड्रोन पाडण्यात आले. अधिकाऱ्यानं सांगितलं की गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांविरूद्धची कारवाई जसजशी वाढली आहे तसतसे खोऱ्यात दहशतवाद्यांजवळ शस्त्रास्त्रांची कमतरता वाढत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा