जालना जिल्ह्यात चाकूचा धाक दाखवून लुटणारे जेरबंद

जालना, दि.९जून २०२०: जालना जिल्ह्यातील राजुर बायपास जवळ असेलल्या ग्रेडर टी पाॅईंट येथे लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या २४ तासात जेरबंद केले आहे. दि. ६ जुन रोजी ग्रेडर टी पाॅईंट येथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीस चाकुचा धाक दाखवून तीघांनी त्याच्याजवळील सात हजारांची रोख रक्कम चोरुन नेली होती.

चंदनझिरा पोलीस ठाण्यात याबाबत विठ्ठल संपत खरात यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार दिपक लक्ष्मण भुसारे याने साथीदारासह ही जबरी चोरी केली आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दिपक लक्ष्मण भुसारे (वय २४, रा. गोकुळवाडी), आकाश रावसाहेब देवकर (वय ३५, रा. लालबाग जालना) व किशोर बाळु खंदारे (वय २७, रा. लक्कडकोट जालना) या तीघांना दिनांक ७ जुन रोजी पाठलाग करुन पकडले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी ग्रेडर टी पाॅईंट येथील जबरी चोरी केल्याचे कबुल केले.

आरोपींच्या ताब्यातील दुचाकीबद्दल विचारपुस केली असता, सदरील दोन्ही दुचाकी या सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरुन आणल्या असल्याचे त्यांना सांगीतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, चोरुन आणलेल्या दोन दुचाकी व रोख तीन हजार असा ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, पो. हे. काॅ.सॅम्युअल कांबळे, पो. ना. गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विलास चेके, रवि जाधव आदींनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा