वाहतूक नियमनाचे काम सोडून एकत्रपणे एकाच ठिकाणी कारवाई करताना आढळून आल्याने तिन पोलीस हवालदारांचे निलंबन

पुणे, २० सप्टेंबर २०२३ : डेक्कन वाहतूक विभागातील तिघा पोलीस हवालदारांना वाहतूक पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. रस्त्यावर कोंडी झाली असतानादेखील वाहतूक नियमनाचे काम सोडून तिघे पोलीस हवालदार एकत्र एकाच ठिकाणी कारवाई करताना आढळून आले होते. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे त्यांनी आपली खिशावरील नेमप्लेट झाकून ठेवली होती.

पोलीस उपायुक्त मगर हे जंगली महाराज रोडवर होते. त्यावेळी प्रभात रस्त्यावरील हॉटेल राॅयल्टी व त्यापुढे वाहतूक कोंडी झाली, दोन्ही बाजूने वाहने लागलेली आहेत. तत्काळ कारवाई करुन वाहतूक सुरळीत करुन द्यावी, असे त्यांनी सांगितले. डेक्कन वाहतूक विभागाला माहिती मिळाल्यानंतर ठाणे अंमलदार पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली, तसेच टेम्पो आणि क्रेन ऑपरेटरला सांगितले.

पोलीस उपायुक्त मगर हे लाॅ काॅलेज रोडने भांडारकर रोडकडे जात असताना तिघे हवालदार वाहतूक नियमन सोडून एकत्र कारवाई करताना आढळून आले. त्यांनी डेक्कन विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली होती. दरम्यान परिसरात वाहतूक कोंडी झाली असतानादेखील हे तिघे हवालदार एकत्र एकाच ठिकाणी कारवाई करताना मिळून आले. यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. असे उपयुक्त मगर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा