गोल पोस्ट महाराष्ट्र महाविद्यालयीन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, परंतु अजुनही पुणे शहरातील ६०% जागा रिकाम्या

महाविद्यालयीन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, परंतु अजुनही पुणे शहरातील ६०% जागा रिकाम्या

पुणे, १८ जुलै २०२३ : पुणे शहर हे विदयेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे शहरात शिक्षणाच्या सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. एमपीएससी, युपीएससी परीक्षांची तयारी करणारे राज्यासह इतर राज्यातील अनेक विद्यार्थी या शहरात येतात. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्वच अभ्याक्रमांचे शिक्षण या ठिकाणी घेता येते. यामुळे पुणे शहर शैक्षणीक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. परंतु पुणे शहरांमधील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या ६०% जागा रिकाम्या आहेत. आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये फक्त ४० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे आहे.

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागतात. अनेक विद्यार्थी पुणे शहरात प्रवेशासाठी गर्दी करतात. परंतु सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिकाम्या आहेत. पुणे विभागात अकरावीत आतापर्यंत ७१ हजार विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. तर पुणे शहरात अज पर्यन्त फक्त ४४ हजार विद्यार्थ्यांनीच अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे.पुणे शहरातील महाविद्यालयीन प्रवेशासाठी तीन फेऱ्या झाल्या आहेत. या तीन फेऱ्यानंतर प्रवेश पूर्ण झाले नसल्यामुळे आता विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. या विशेष फेरीतून विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी दिली जाणार आहे.

पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली आहे. या दोन्ही शाखांचे प्रवेश १००% झाले आहेत.परंतु कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कला शाखेच्या ७० टक्के जागा रिक्त आहेत. यामुळे आता १७ जुलैपासून विशेष फेरी राबवण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा कल सध्या विज्ञान अन् वाणिज्य शाखेकडे आहे. यामुळे या दोन्ही शाखांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत बारावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. वाणिज्य शाखेत बारावीनंतर विद्यार्थी विविध व्यवस्थापनशास्त्र शाखेकडे जातात. त्या तुलनेत कला शाखेकडे प्रवेश कमी आहे. यामुळे कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version