कुपवाडा येथे दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या कारवाईत तीन सैनिक शहीद

कुपवाडा, ८ नोव्हेंबर २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाची कारवाई सुरू आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील एलओसीजवळ सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलातील तीन जवान शहीद झाले. या कारवाईत लष्कराचे दोन सैनिक आणि एक बीएसएफ सैनिक शहीद झाले आहेत. यापूर्वी सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न फसला. यात दोन घुसखोर ठार झाले.

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, कॉन्स्टेबल सुदीप सरकार यांना माछिल सेक्टरमधील ऑपरेशन दरम्यान प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांविरूद्धच्या कारवाईत भारतीय सैन्यही सामील आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांविरूद्ध संयुक्त कारवाई अजूनही सुरू आहे.

शनिवारी रात्री माछिल सेक्टरमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एलओसीवर संशयास्पद हालचाल दिसून आली. दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून एक एके रायफल व २ बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. लष्कराचं म्हणणं आहे की दहशतवाद्यांविरूद्ध त्यांचं ऑपरेशन चालू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा