मुंबई, 15 सप्टेंबर 2021: देशातील अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यथोचित परिश्रमानंतर शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. राकेश झुनझुनवाला ज्या स्टॉकला स्पर्श करतात, तो शेअर तेजीत येत असतो. त्यांच्या एका गुंतवणुकीने गेल्या 6 महिन्यांत प्रचंड परतावा दिला आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी जुबिलेंट इंग्रेवियामध्ये ( Jubilant Ingrevia) गुंतवणूक करून मोठी कमाई केली आहे. जुबिलेंट इंग्रेवियाचा शेअर 19 मार्च 2021 रोजी 258.35 रुपये होता, जो 14 सप्टेंबर रोजी वाढून 773 रुपये झाला आहे. म्हणजेच, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने तीनपट जास्त परतावा दिला आहे.
14 सप्टेंबर रोजी ट्रेडिंग दरम्यान, या कंपनीच्या शेअरने 782 रुपयांची उच्च पातळी गाठली, तर हा स्टॉक गेल्या एका वर्षातील 241.30 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, 19 मार्चनंतर सेन्सेक्समध्ये 18.48% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.
या वर्षी जून तिमाहीच्या अखेरीस, राकेश झुनझुनवाला यांचे ज्युबिलेंट इंग्रेवियामध्ये एकूण 1 कोटी शेअर्स किंवा 6.29% भागभांडवल होते. गेल्या तिमाहीत त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फर्ममध्ये 25.20 लाख शेअर्स किंवा 1.58% हिस्सा होता.
जुबिलेंट इंग्रेव्हियामधील विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा जून तिमाहीत 18.7 टक्क्यांवर घसरला. मार्च तिमाहीत त्यांचा हिस्सा 24.28 टक्के होता. सध्या जुबिलेंट इंग्रेवियाची मार्केट कॅप 12,377 कोटी रुपये आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे