तीन तोतया पोलीस अटक…..

इंदापूर, दि. ०८ ऑगस्ट २०२०: राज्य उत्पादन शुल्क खात्याचा बनावट अधिकारी बनून त्याचप्रमाणे त्याचे साथीदार पोलीस बनवून हॉटेलमध्ये फुकट खानपान करणाऱ्यांना भिगवण पोलिसांनी अटक केली. अशोका लॉजचे चालक रामण्णा चन्नकेशवा (रा.मदनवाडी ता.इंदापुर जि.पुणे मुळ रा . येलाकुल भेटु , केंजुर व्हिलेज ता.जि. उडपी कर्नाटक)यांच्या फिर्यादीवरुन तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मदनवाडी चौफुला येथील अशोका लॉज., येथे आरोपींनी जावुन लॉज चालकास आम्हाला एक रुम पाहीजे असे सांगितले .फिर्यादीने रुम नाही असे, म्हणल्यानंतर तुम्ही मला ओळखत नाही का ? मी एक्साईजचा डि.वाय.एस.पी. आदित्य पवार आहे असे सांगितले. त्यावेळी त्या दुसऱ्या इसमाने आम्ही पोलीसवाले आहोत आमच्या केसाचा कट बघा त्यावरुन तुम्हाला माहीती पडत नाही का आम्ही ड्रेसवर आलोतर तुम्ही आम्हाला ओळखणार असे म्हणाला, तर तिसऱ्या इसमाने आम्ही पोलीसवाले आहोत मी साहेबांना फोन करतो.

सागर शहाजी पवार ,कुलदिप बाळकृष्ण कांबळे दोघेही रा. लाखेवाडी ता इंदापूर नवनाथ रा दौंड . ता.दौंड जि.पुणे ( पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर तिन्ही इसम हे लोकसेवक नसताना लोकसेवक असल्याची बतावणी केली त्याचप्रमाणे खानपान करुन तोतयागिरी केली. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा