गाझियाबाद १४ जून २०२३: गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून अल्पवयीन मुले आणि युवकांचे धर्मांतर करीत असल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहनवाज उर्फ बद्दो याचे पाकिस्तानी कनेक्शन तपासात समोर आले आहे. बद्दोच्या मोबाईलमध्ये ३० पाकिस्तानी मोबाईल क्रमांक सापडले आहेत.
बद्दो याला ११ मे रोजी अलिबागमध्ये सापळा रचून पकडण्यात आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला गाझियाबाद पोलिसांकडे सुपूर्द केले होते. ATS आणि केंद्रीय तपास संस्थांनी सलग सात तास केलेल्या बद्दोच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील एक ई-मेल तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही लोकांसोबत बद्दो याने केलेले चॅटिंग, तपास संस्थांच्या हाती लागले आहे.
लाहोरमध्ये राहणाऱ्या एका वाहतूक पोलिसांच्या संपर्कात बद्दो होता. गाझियाबादमधील ज्या युवकांचे धर्मांतरण करण्यात आले होते, त्यांच्याशी बद्दो मोबाईलवर साडेतीनशे वेळा बोलला होता. लॅपटॉप तसेच मोबाईलमधला बराच डेटा त्यांने उडविलेला आहे. त्यामुळे हा डेटा हस्तगत करण्याचा तपास संस्थांचा प्रयत्न सुरू आहे,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर