पुणे, 27 सप्टेंबर 2021: मेड इन चायना स्मार्टफोनबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. लिथुआनिया सरकारनं आपल्या नागरिकांना चिनी स्मार्टफोन फेकून देण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर सरकारकडून असंही म्हटलं गेलंय की भविष्यात चीनी फोन खरेदी करू नका.
सरकारनं यासाठी दोन स्मार्टफोन निर्मात्यांची नावंही अधोरेखित केली आहेत. यात शाओमी आणि हुआवेई स्मार्टफोन फेकून देण्यास सांगितले आहे. फोनच्या बिल्ट इन सेन्सॉरशिप हे यामागील कारण आहे. यामुळं काही अटी फोनमध्ये ब्लॉक झाल्या आहेत.
लिथुआनिया ने हा आरोप अश्या वेळी केला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. चीनी स्मार्टफोनवरील हे आरोप लिथुआनियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या एका नवीन अहवालात करण्यात आले आहेत.
अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, सिस्टम ॲप आपोआप झिओमी फोनमध्ये 449 अटी सेन्सॉर करते. त्यात फ्री तिबेट, लॉंग लीव तैवान इंडिपेंडन्स, डेमोक्रसी मूव्हमेंट सारख्या शब्दांचा समावेश आहे. लिथुआनिया सायबर सिक्युरिटीच्या मते, युरोपमध्ये झिओमीचा फ्लॅगशिप फोन Mi 10T 5G मध्ये सेन्सॉरशिप कैपिबिलिटी सापडली.
एजन्सीने म्हटलं आहे की, हे युरोपियन युनियन प्रदेशासाठी ब्लॉक केलं गेलं आहे परंतु ते कधीही दूरस्थपणे चालू केले जाऊ शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, संरक्षण उपमंत्री मार्गिरीस अबुकेविशियस यांनी लोकांना नवीन चिनी फोन न खरेदी करण्याचं आवाहन केलं. याशिवाय जुना फोन लवकरात लवकर टाकून देण्यास देखील सांगितलं आहे.
नॅशनल सायबर सेंटर लिथुआनियाच्या मते, चिनी स्मार्टफोनमध्ये आणखी एक दोष आढळला. झिओमीबद्दल, असं म्हटलं गेलं की फोन सिंगापूरमधील सर्व्हरला एन्क्रिप्टेड फोन यूजेज डेटा पाठवत आहे. याशिवाय, Huawei P40 5G मध्ये देखील एक दोष आढळला. तथापि, या तपासणीत वनप्लस दोषी आढळला नाही. बीएनएस न्यूज वायरशी झालेल्या संभाषणात हुआवेईने हे आरोप फेटाळले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे