ती कार शोपियांमध्ये राहणाऱ्या हिजबुल दहशतवाद्याची होती

पुलवामा, दि. २९ मे २०२०: पुलवामा मध्ये दुसरा आतंकवादी हल्ला घडवून आणण्याचा कट सुरक्षा दलाकडून विफल करण्यात आला होता. या कटामध्ये ४० किलो स्फोटके असलेली एक कार जप्त करण्यात आली आहे. जप्त केल्यानंतर ही स्फोटके निष्क्रीय करण्यात आली. यानंतर आता सुरक्षा एजन्सीला मोठे यश हाती लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कटामध्ये वापरात आलेल्या कारच्या मालकाचा पत्ता लागला आहे. ही कार शोपियानमधील रहिवासी हिदायतुल्ला नावाच्या व्यक्तीची आहे. २०१९ पासून हिदायतुल्ला हा हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी आहे.

दहशतवाद्यांनी पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा कट रचला होता, याला सुरक्षा यंत्रणांनी वेळीच नाकाम केले. पुलवामा पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की दहशतवादी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत. रात्री अकराच्या सुमारास अयानगुंडमध्ये एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार आली.

या कारमध्ये दुचाकी नंबर प्लेट होती. सुरक्षा दलाने कार थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कारमध्ये बसलेल्या दहशतवाद्याने यू-टर्नने घेवून गाडी पळविली. अंधाराच्या ठिकाणी जाताच दहशतवादी कार सोडून पळून गेले. गाडीचा त्वरित शोध घेण्यात आला. कारच्या आत स्फोटकांनी भरलेला एक मोठा निळा ड्रम होता. ४० ते ४५ किलो स्फोटकांनी कार भरली होती.

बॉम्ब विल्हेवाट पथकाला तातडीने घटनास्थळी बोलविण्यात आले. ताबडतोब जवळपासची गावे रिकामी केली गेली आणि नंतर हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला. ही तीच जागा आहे जिथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या काफिल्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा