टिकटाॅक अमेरिकेला विका, डोनाल्ड ट्रम्पचा चीनला इशारा….

अमेरिका, ४ ऑगस्ट २०२० : जगाला कोरोना देऊन चीन इतर देशांशी सीमेवर कुरघोडी करतोय त्यात अमेरिका आणि चीन यांच्यातील संबध चांगलेच ताणले गेले आहेत. तर कोरोना विषाणुचा सर्वाधिक फटका हा जगात अमेरिकेला बसल्याचे बघायला मिळते. ज्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीन वर मोठ्या प्रमाणात चिडलेले असून त्यांनी अमेरिकेतील चीनचे दूतावस बंद पाडले. तर भारत चीन वादावर भारता बरोबर राहून चीनचा विरोध केला आता अमेरिका चीनच्या डिजीटल माध्यमांवर घाला घालताना दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा टिकटाॅक, जो भारतातून कधीच हद्दपार झाला आहे. त्या टिकटाॅकला भारतात बंदी आहे. अशा अॅपला १५ सप्टेंबर पर्यंत अमेरिकन कंपनीला विकून टाका नाहीतर मग आम्ही यावर बंदी घालू असे ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनी हि टिकटाॅकला विकत घेण्याच्या चर्चेला सोशल मिडीयावर उधाण आले होते. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध होता. पण आता याच कंपनीने जर टिकटाॅक विकत घेतले तर ते मनोरंजक होईल असे ट्रम्प यांनी या वेळी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा