‘टिकटॉक’नं नाकारला मायक्रोसॉफ्टचा सौदा, ऑरेकल शर्यतीत पुढं

11

वॉशिंग्टन, १४ सप्टेंबर २०२०: मायक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत मागं पडताना दिसतीय. टिकटॉकच्या मूळ कंपनीनं मायक्रोसॉफ्टची बोली नाकारली आहे. याचा अर्थ असा आहे की आता चीनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक मायक्रोसॉफ्टकडून विकत घेतलं जाणार नाही.

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी आणण्याची धमकी दिल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बाइटडांस’ला टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय विकायला १०० दिवसांचा अवधी दिला. दुसर्‍या अहवालानुसार आता अमेरिकन आयटी कंपनी ऑरेकल टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करू शकते.

मायक्रोसॉफ्टनं एका निवेदनात म्हटलं आहे की बाईटडन्सनं मायक्रोसॉफ्टला अशी प्रतिक्रिया दिली आहे की ते (बाईटडन्स) आपला अमेरिकन व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकणार नाही. गेल्या महिन्यातच मायक्रोसॉफ्टनं बातमी दिली आहे की कंपनी अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करण्याची तयारी करतेय.

मायक्रोसॉफ्टची बोली फेटाळल्यानंतर अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्यासाठी या शर्यतीत अग्रेसर होती. अलीकडच अशी बातमी आली की ओरॅकल टिकटॉकच्या अमेरिकन व्यवसायासाठी इच्छुक आहे.

दुसर्‍या अहवालानुसार, आईटी कंपनी ओरॅकलनं टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्यासाठी बोली जिंकली आहे. आतापर्यंत ओरॅकल किंवा टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा