टिकटॉकला पर्याय; युट्यूबचे ‘शॉर्टस’ लाँच

10

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: टिकटॉकवर भारतात बंदी आल्यानंतर त्याला पर्याय युट्यूबने भारतीय युजर्ससाठी शॉर्टस लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शॉर्टस प्लॅटफॉर्मवर टिकटॉक प्रमाणेच युजर १५ सेकंदापर्यंतचे छोटे व्हिडीओ बनवून अपलोड करू शकणार आहेत.

युट्यूब शॉर्टस प्लॅटफॉर्मवर युजर्सना व्हिडीओ एडीट करण्यासाठी टूल्स दिली गेली आहेत. त्याचबरोबर युट्यूबवर लायसन्स असलेली गाणी व्हीडीओला युजर्स जोडू शकणार आहेत.

दरम्यान, शॉर्टस प्लॅटफॉर्म सध्या प्रारंभिक अवस्थेत असून लवकरच त्यात कालानुरूप बदल करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता टिकटॉक प्रेमिंसाठी ही मोठी बातमी म्हणायला हरकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा