गोल पोस्ट राष्ट्रीय २० मे पर्यंत देशभरात धावल्या १७७३ श्रमिक स्पेशल गाड्या

२० मे पर्यंत देशभरात धावल्या १७७३ श्रमिक स्पेशल गाड्या

नवी दिल्ली, दि. २१ मे २०२०: गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, यात्रेकरी, पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोहचते करण्यासाठी  दि. १ मे २०२० पासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

काल दि.२० मे २०२० (सकाळी १० वाजेपर्यंत) देशातल्या विविध राज्यांत एकूण १७७३  गाड्या चालवल्या गेल्या. या “श्रमिक स्पेशल” गाड्यातून २३.५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या राज्यात पोचले आहेत.

परवाच्या एका दिवसात म्हणजे  दि.१९ मे २०२० रोजी एकाच दिवशी देशातल्या विविध राज्यांत एकूण २०५  गाड्या चालवून त्यातून २.५ लाख प्रवाशांना आपापल्या राज्यांत पोहचवून एक विक्रम केला गेला.

या १७७३ गाड्या, आंध्रप्रदेश, बिहार, चंदिगड (कें.प्र.), दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पुदूचेरी(कें.प्र.), पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश,
उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांतून सोडण्यात आल्या. तसेच या श्रमिक स्पेशल गाड्या आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, 
केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र,  मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, 
उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात परतल्या.

सर्व प्रवाशांचे गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनींग केले जात आहे. प्रवाशांना गाडीत मोफत जेवण आणि पाणी पुरवले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version