“श्रमिक विशेष” गाड्यांमधून आत्तापर्यंत १२ लाख मजुरांनी केला प्रवास

नवी दिल्ली, दि. १६ मे २०२०: गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशी श्रमिकांना, तीर्थयात्रेकरूंना, पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि अन्य व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पोहचविण्यासाठी १ मे २०२०, कामगार दिनाच्या दिवशी “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

१ मे २०२० रोजी, केवळ चार रेल्वेगाड्यांपासून सुरूवात करून भारतीय रेल्वे १५ दिवसांपेक्षा कमी कालावधीत १००० हून अधिक “श्रमिक विशेष” रेल्वे कार्यान्वित करण्यात यशस्वी झाली आहे. १४ मे २०२०, रोजी एक उल्लेखनीय यश अधोरेखित करतानाच विविध राज्यांमधून एकूण १४५ “श्रमिक विशेष”  रेल्वे गाड्या कार्यान्वित केल्या ज्याच्या माध्यमातून २.१० लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना त्यांच्या मूळ राज्यांपर्यंत पोहचविण्यात आले. श्रमिक रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा २ लाखांचा टप्पा पार केल्याची ही पहिलीच घटना आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, १ मे २०२०, रोजी ५००० हजार प्रवाशांसह “श्रमिक विशेष” रेल्वे कार्यान्वित करण्यात आली होती. आतापर्यंत १२ लाख प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी “श्रमिक विशेष” रेल्वेच्या माध्यमातून आपापल्या घरी पोहचले आहेत.

या सगळ्या गाड्या आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणीपूर, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपूरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांपर्यंत गेल्या आहेत.

भारतीय रेल्वेची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, विविध ठिकाणी अडकलेल्या आणि घरी परतू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी, त्यांना घरी नेण्याच्या मोहिमेअंतर्गत, रेल्वेने संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधून, दररोज चार लाखांहून अधिक अडकलेल्या लोकांसाठी “श्रमिक विशेष” रेल्वेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मूळ स्थानी पोहचविण्यासाठी रोज ३०० श्रमिक विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची तयारी ठेवली आहे.

ज्या राज्यातून प्रवासी प्रवास करणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी जाणार त्या दोन्ही  राज्यांकडून परस्पर सहमती मिळाल्यानंतरच रेल्वेद्वारे कार्यान्वित होणाऱ्या या “श्रमिक विशेष”  रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी चढण्यापूर्वी त्यांची पुरेशी आणि योग्य तपासणी केली जाते. प्रवासाच्या काळात प्रवाशांना मोफत जेवण आणि पाणी दिले जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा