हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

बारामती, दि. ३० जून २०२०: बारामती शहर व तालुक्यातील हॉटेल,रेस्टॉरंट, धाबे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आता कामगार व दैनंदिन खर्च शक्य नसल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याचे काही हॉटेल मालकांनी सांगितले आहे. राज्य सरकारने हॉटेल उघडण्यास परवानगी नाकारल्याने हॉटेल व्यावसायिक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.सध्या बारामती शहरात कोरोनाचा रुग्ण नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना पार्सल देण्याची सुविधेला परवानगी दिली आहे. मात्र पार्सल नेण्यासाठी ग्राहकांकडून अत्यल्प प्रतिसाद असल्याने हॉटेल मधील रोजचा होणारा खर्च देखील वसूल होत नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

बारामती शहरात जवळपास दोनशे पन्नास छोटी मोठी हॉटेल आहेत.तसेच हॉटेल साठी जागा भाडे तत्वावर घेतल्याने हॉटेल उघडावे लागत आहेत मात्र रोजचा खर्च,लाईट बील, कामगारांचे पगार अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या बरेच व्यवसाय सुरू आहेत मात्र शासनाने फक्त हॉटेल व्यवसायाला कडक नियम लावले असल्याने मागील काही महिन्यात लाखो रुपयांचे नूकसान झाले असल्याचे काही संतप्त हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा