भारतातील तिरुपती बालाजी मंदिर बनतंय कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र…..

आंध्र प्रदेश, ११ ऑगस्ट २०२० : कोरोनाने भारताला आपले मुख्य केंद्र केले की काय अशी सध्याची वाढती रुग्णसंख्येचा अकडा पाहून वाटत आहे. सध्या भारतात कोरोनामुळे सर्वच धार्मिक स्थळे हि बंद आहेत. तरी भारतातील प्रसिद्ध मंदिरा पैकी एक मंदिर कोरोनाचा नविन हाॅटस्पाॅट केंद्र बनले आहे.

भारतातील तिरुपती मंदिर हे भक्तांच्या अग्रास्तव उघडण्यात आले खरे पण तेंव्हापासूनच जवळपास ७४३ मंदिरातील कर्मचारी आणि पुजारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी आधिकारी अनिल सिंघल यांनी दिली.

मंदिर सुरु झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरामध्येच म्हणजेच १६ जून रोजी मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना केरोनाची बाधा झाली होती. सिंघल यांनीच यासंदर्भातील माहिती त्यावेळी दिली होती. १४ पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचना करण्यात आल्या होत्या.

या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आलं. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री वेंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार चालवला जातो. लॉकडाउनमुळे या मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच केंद्र सरकारने जूनच्या पाहिल्या आठवड्यामध्ये नियम शिथिल केल्यानंतर मंदिर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२० मार्चपासून बंद असणारे मंदिर ८ जून रोजी म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर पहिल्यांदा उघडण्यात आलं तेव्हा पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल २५ लाख ७० हजार रुपये दान केले होते. पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी म्हणजे ११ जूनपासून मंदिर स्थानिकांबरोबरच सर्व भक्तांसाठी उघडण्यात आले होते.

तसेही भारतात गेल्या आठवड्याभरा पासून ५० हजार पेक्षा जास्त रुग्ण भेटत आहेत. आणि त्यातच केंद्र सरकारने लाॅकडाऊनचे नियम शिथिल केले आहे.तर देशातील अनेक धार्मिक स्थळे सध्या उघडत असली तरी त्यांनी नवीन हाॅटस्पाॅटचे केंद्र निर्माण होणा-या जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरांचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा