गोल पोस्ट इतर माहिती तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादाला ३०० वर्षे पूर्ण

तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादाला ३०० वर्षे पूर्ण

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील श्रीमंत देवस्थान तिरूमला तिरूपती वेंकटेश्वरच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या लाडूंच्या प्रथेला यंदा ३०० वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रसादम म्हणून दिला जाणारा हा लाडू ३०० वर्षांचा झाला आहे.
याबाबत तिरूपती देवस्थानमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट १७१५ साली प्रथम लाडू हा प्रसाद म्हणून बनविला गेला. त्यात साखर, तूप, आटा, वेलदोडा, सुकामेवा व कापूर घालून बनविले जात असलेले लाडू जगभरात भाविकांच्या श्रद्धेचा विषय बनले आहेत.
तिरूपती लाडू हे नांव वापरून अन्य कोणी लाडू विक्री करू, नये म्हणून या लाडवांचे भौगोलिक संपदा पेटंट घेतले गेले आहे.
लाडवाच्या विक्रीतून देवस्थानला प्रचंड कमाई होते. ३०० ग्रॅम वजनाचा लाडू २५ रूपयांना दिला जातो. २०१४-१५ मध्ये लाडू विक्रीतून देवस्थानला १९० कोटी रूपये मिळाल्याचे सांगितले जाते.
हा प्रसाद इतका महत्त्वाचा बनला आहे की वेंकटेश्वराच्या दर्शनास येणार्‍या भाविकांची यात्रा लाडू प्रसाद घेतल्याशिवाय पुरीच होत नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version