तिरुपती मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद

तिरुमला, १२ ऑक्टोबर २०२२: तिरुमला येथील भगवान व्यंकटेव्श्रर मंदिर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि ८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण असल्यामुळे या दोन्ही दिवशी मंदिर दर्शनासाठी सुमारे १२ तास बंद राहणार आहे. २४ ऑक्टोबरला दिवाळी असल्याने यावेळी सूर्यग्रहणाला विशेष महत्व असते.

यावेळी भाविकांना कोणत्याही प्रकारचे दर्शन घेता येणार नसल्याचे मंदिराच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे पहाडी मंदिराचे दरवाजे सकाळी ८.१० ते संध्याकाळी ७.५० पर्यत बंद केले जातील. नंतर, भाविकांना प्रार्थना करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

८ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे प्राचीन मंदिराचे दरवाजे सकाळी ८.४० ते संध्याकाळी ७.२० पर्यंत बंद राहणार आहेत. या दोन दिवसाच्या ग्रहण काळात कोणतीही मिरवणूक किंव्हा कोणता विधी करता येणार नाही. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही काळात देशातील अनेक प्रमूक मंदिरांचे दरवाजे बंद असतात.

यामध्ये जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचाही समावेश आहे‌. ग्रहणाचा कालावधी असेपर्यंत मंदिरे बंद राहतील आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा दरवाजे उघडले जातील, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा