अफवा टाळण्यासाठी, पोलीस वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून जनजागृती

उस्मानाबाद, ३ ऑगस्ट २०२०: वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र गंभीर परिस्थितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. यामध्ये नागरिकांना नियमांबाबत काही गैरसमज होऊ नये म्हणून, पोलीस वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून जनजागृती केली जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील लॉकडाउन हे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. अनेक मनाई आदेश अंमलात असून त्यामध्ये गरजेनुसार वेळोवेळी बदल ही केले जात आहेत. या परिस्थितीत नागरिकांना काही गैरसमज होऊ नये, त्यांना या मनाई आदेशांची योग्य माहिती व्हावी या उद्देशाने, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तैनात असणाऱ्या पोलीस वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून नियमितपणे जनजागृती करण्याचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी दिले आहेत.

निर्देशानुसार बाजारपेठा, प्रतिबंधीत क्षेत्रे, गर्दीची ठिकाणे, या ठिकाणी पोलीस वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून जनजागृती केली जात असून, यामुळे नागरिकांना मनाई आदेशांची योग्य ती माहिती होत आहे. आणि अशा प्रकारे अफवा टाळण्यासाठी देखील मदत होत आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा