बिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यानंतर ही रुग्णाला २ दिवस ठेवलं व्हेंटिलेटर वर

कोलकाता ,४ सप्टेंबर ,२०२०: सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे सावट पसरलेले आहे. कोरोना रोगाने अक्षरशः थैमान घातला आहे असे असताना सुद्धा देशातील काही प्रामाणिक डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करत आहे. असे असताना सुद्धा काही ठिकाणची स्थिती मात्र वेगळी होत चालली आहे .काही ठिकाणी मात्र पेशंटच्या टाळू वरचे लोणी खायचा प्रकार होत आहे असे समोर आले आहे.

हुगळी जिल्ह्यातल्या एका कोरोना रुग्णाला कोलकत्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. ३१ ऑगस्टला त्या हॉस्पिटलने ४७ हजारांचं बिल दिलं होतं. त्या आधी दोन दिवस रुग्णाचे नातेवाईक पेशंटला पाहू देण्याची विनंती करत होते. मात्र त्यांना पाहू दिलं गेलं नाही.या घटनेने संपूर्ण कुटुंबीयामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

तसेच जेव्हा बिल भरण्याची वेळ आली तेव्हा काही वेळातच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली असा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.तसेच झालेल्या प्रकरणाची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा