“गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार”! भाई जगतापांना भाजपचा टोला

मुंबई, १० जुलै २०२१: देशात आणि राज्यात इंधनाचे दर सातत्याने वाढत असून, याविरोधात आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. वाढत्या इंधनावरून दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे काल (१० जुलै) आयोजन केले होते. यासाठी काँग्रेसने मोर्चा काढला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, भाजपाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे.

या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले.

घटनेचा व्हिडीओ ट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे. उपाध्ये यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला भविष्यातील वाटचालीबद्दलही इशारा दिला आहे.

“गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार!

गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोहोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे

केशव उपाध्ये काय म्हणाले?

“भाई जगतापजी, तोल सांभाळा… महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा”, असं केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा

भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा
एका बैलगाडीवर जेवढे लोक बसू शकतात त्याच्या चारपट ओझे लादून बैलांचा छळ केल्याबद्दल भाई जगताप यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणीही कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा