राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार; शरद पवार यांची मोठी घोषणा

14

मुंबई, २ मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतच्या निर्णय आज घेतला आहे. अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले आहे.

यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रीय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले आहे.

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकत्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा