कराडमधील नागरिकांच्या अडचणी सोडवणार : पृथ्वीराज चव्हाण

9

कराड, दि.८मे २०२०: कराड परिसरामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून कराड शहरासह आसपासची तेरा गावे पूर्ण लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
२३ मार्चपासून सुरु झालेला या कडक लॉकडाऊनमुळे कराडच्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या सर्व समस्यांबाबत कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने यांनी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली.

कराड शहरातील जनता लॉकडाऊनचे काटेकोर पालन करीत आहे. परंतु, जीवनावश्‍यक वस्तूच मिळत नसल्याने कराडचे नागरिक त्रस्त आहेत. यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन शहरातील जनतेच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्व समस्यांची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांच्यासह आदी उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा