शिकागो सर्वधर्म परिषदेस प्रा. नामदेवराव जाधव निमंत्रित

5

कोल्हापूर, ५ ऑगस्ट २०२३ : शिकागो येथे दि.१४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या सर्वधर्म परिषदेस संबोधन करण्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार, लेखक प्रा.नामदेवराव जाधव यांना निमंत्रित केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर १३० वर्षांनी सर्वधर्म परिषदेला संबोधन करण्याची संधी प्रा. जाधव यांना मिळाली असून, विविध संघटनांनी त्यांच्या सत्कार केला आहे.

जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्वधर्म परिषद यावर्षी शिकागो, अमेरिका येथे संपन्न होत आहे. या सर्वधर्म परिषदेसाठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व प्रा. नामदेवराव जाधव करणार आहेत. शिकागो येथे १८९३ साली झालेल्या सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केले होते. १३० वर्षांनंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळाला आहे.

प्रा. जाधव शिकागो येथे हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलणार आहे. हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार या संदर्भातील कसा जगाला मार्गदर्शक आहे. याबाबत आपले विचार मांडणार आहेत. जगातील २४० देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा