आजच्या हिरकणीने बाळासाठी केला २१ किलोमीटरचा पायी प्रवास

गडचिरोली, ८ जुलै २०२० : गडचिरोलीमधील भामरागड येथील एक धक्कादायक घटना समोर अली. भामरागड सारख्या दुर्गम भागात एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी १८ किलोमीटरचा प्रवास चक्क पायी करावा लागला. एवढेच नाही तर त्या महिलेला प्रसूतीनंतर पुन्हा ५ दिवसानंतर परतीचा प्रवास देखील पायीच आपल्या गावी करावा लागला.

तुर्रेमर्का गावातील नागरिकांना गावात रस्ते नसल्याने पायीच माळरानातून जंगलातून पायवाट काढत रुग्णालयात जावे लागते. अशाच भागात राहणाऱ्या रोशनी पोदाडी या गर्भवती महिलेला ३ जुलैला प्रसूतीसाठी २८ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. रोशनी पोदाडी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून प्रसूती झाल्यानंतर देखील ५ दिवसांनी बाळाला पुन्हा जंगलातून डोंगर भागातून पाय वाट काढत तीला परतीचा प्रवास करावा लागला.

रुग्णालयातून बाळाला व तिच्या आईला रुग्णवाहिकेने लाहोरीपर्यंत पोहचवले पण पुढे रस्ता नसल्याने त्यांना राहिलेला १८ किलोमीटरचा प्रवास हा पायीच करावा लागला. माळरानातून डोंगरातून जंगलातून मोठ्या हिमतीने संकटांवर मात करत पुन्हा आपल्या गावी बाळा सोबत ती सुखरूप घरी पोहचली.

परंतु या घटनेनंतर आजही अनेक दुर्गम भागात हवी तशी सुविधा उपलब्ध नाही हे दिसून येते. ज्यामुळे अशा घटना एकदा नसून वारवांर घडत असतात. नागरिकांकडून देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. तसेच अशा घटनेचा सरकारने देखील गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा