मुंबई, १६ नोव्हेंबर २०२० : राज्यात आज ३ हजार ६५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १६ लाख १५ हजार ७९ रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४५ शतांश टक्के झाला आहे. आज २ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ४७ हजार २४२ झाली आहे.सध्या ८४ हजार ९१८ रुग्ण उपचार घेत आहेत. काल १०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृत्यूदर २.६३ शतांश टक्के एवढा आहे. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार १५१ इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णाची भर पडली आहे, त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णांची आतापर्यंतची एकुण संख्या ४१ हजार ८४८ वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५१ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीत ६ जण करोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या आठ हजार ११३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.४९ शतांश टक्के झालं आहे. जिल्ह्यात आज ४ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आठ हजार ५८६ झाली आहे. सध्या ८४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १६ वर्षांच्या एका तरुणीचा चिपळूणच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ३१९ झाली आहे.
सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रभाव आता कमी होऊ लागलाय. आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७९३ झाली आहे.सध्या जिल्ह्यात १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ७० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १३१ झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी