आज सहा वाजता मोदी देशाला करतील संबोधित

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संबोधित करतील. ट्विटमध्ये त्यांनी सर्व लोकांना सामील होण्यास सांगितले आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आज संध्याकाळी ६ वाजता मी देशाला संबोधित करेल. नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा करताच आता सर्वांचं लक्ष त्यांच्या सहा वाजताच्या भाषणाकडं लागलं आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी कोरोना काळात अनेकदा देशाला संबोधित करीत होते. त्यानंतर आता नरेंद्र मोदी आपल्या आजच्या भाषणात काय घोषणा करतील याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी केलं होतं संबोधित

यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं.

कोरोना वर करू शकतात भाष्य

असा अंदाज वर्तविला जात आहे की, ते पुन्हा एकदा आपल्या संबोधनात कोरोना महामारीचा उल्लेख करतील. माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारनं यापूर्वीच येणाऱ्या सणांच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. अशा वेळी त्याबाबतच्या सूचना देखील मोदी आपल्या या संबोधनात देतील. मोदींच्या संवर्धनाबाबत लोकांच्या मनात उत्सुकता असतेच पण, यासह आता लोकांच्या मनात भीतीसुद्धा येऊ लागली आहे की ते आपल्या संबोधनात काय घोषणा करतील.

बिहार विधानसभा निवडणुका आणि चीन-विवादावर भाष्य

कोरोना व्यतिरिक्त ते चीनबरोबर सुरू असलेल्या वादावरही चर्चा करू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच सध्या बिहार मध्ये निवडणुका असल्यामुळं राजकीय रिंगण देखील तापलेलं आहे. त्यामुळं यावर देखील ते आपल्या संबोधनात भाष्य करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा