आज ७ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वजदिन, काय आहे या दिवसाचे महत्त्व..?

पुणे, ७ डिसेंबर २०२०: आज ७ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वजदिन,७ डिसेंबर १९४९ पासून सशस्त्र सेना ध्वजदिन पाळला जातो. सामन्य लोकांमधे छोटे ध्वज वाटून त्यांच्याकडून देणगी जमा केली जाते,हि ध्वजदिनामागची संकल्पना आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक विशेष दिवस आहे.

आजच्याच दिवशी १९४९ पासून भारतीय लष्करांकडून हा दिवस दरवर्षी “भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन”म्हणून साजरा केला जातो. हा ध्वजदिन साजरा करण्याचे मुख्य उद्देश भारतीयांना आपल्या देशाप्रतीचे सन्मान व्यक्त करण्यासाठी आहे. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी शहिद झालेल्या कुटुंबातील सदस्या प्रती भावना व्यक्त करणारा हा दिवस.

ध्वज विकून जमा केलेल्या देणगीचे मुख्य उद्देश

आज प्रत्येक नागरिकांना छोटे ध्वज देण्यात आणि जमा झालेल्या देणगी मधून शहिद झालेल्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ते खर्च केले जातात. या चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युद्धातील जखमींचे पुनर्वसन, भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण आणि माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियाचे पुनर्वसन कल्याण.

भारतीय लष्करांचा अल्प परिचय…

इंडियन आर्मीची स्थापना ब्रिटिशांनी १ एप्रिल १८९५ साली केली होती. त्यावेळी इंडियन आर्मीला ब्रिटीश इंडियन आर्मी म्हटले जायचे. मुख्यतः ईस्ट इंडिया कंपनीसाठी या दलाची स्थापना करण्यात आली होती.

भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) राॅयल इंडियन एअर फोर्स असे नाव स्वंतत्र्या नंतर बदलण्यात आले. पण, १९५० नंतर प्रत्यक्ष भारतीय संविधानानुसार कारभार सुरू झाल्यानंतर भारतीय हवाई दलातून राॅयल हा शब्द वगळण्यात आला. ग्लोबल फायर पाॅवर नुसार भारतीय हवाई दल जगातील चौथ्या नंबरचे शक्तीशाली दल आहे. या आधी अमेरिका, रशिया आणि चीन चा नंबर लागतो.

१६१२ मधे राॅयल इंडियन नेव्ही म्हणून ओळखल्या जाणार्या दलाची पहीली शाखा ईस्ट इंडिया कंपनी कडून स्थापन करण्यात आली होती. २६ जानेवारी १९५० रोजी याचे नाव ‘इंडियन नेव्ही’ करण्यात आले. भारतीय नेव्हीचे ‘ब्रम्होस’ हे मिसाईल क्षेपणास्त्र जगातील सर्वात वेगवान क्रुज मिसाईलपैकी एक आहे.

भारतीय लष्करांची हिम्मत मेहनत…

१९८२ मधे जास्त प्रमाणात आधुनिक साधनसामुग्री नसताना ही भारतीय लष्करांनी समुद्रसपाटी पासून ५,६०२ मीटर उंचीवर लद्दाख मधे ‘द बेली’ ब्रीज बांधाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा