आज अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन, जाणून घेऊया त्यांच्या विषयी

कौटुंबिक पार्श्वभूमी

अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ‘वाटेगाव’ येथे झाला.अण्णांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचे गाव पूर्वी कुरूंदवाड संस्थानात होते. वडील भाऊराव आई बालुबाई. अण्णाभाऊ साठे यांचे २ विवाह झाले. त्यांच्या दुसन्या पत्नीचे नाव जयवंताबाई होते व त्याही अण्णांप्रमाणेच समाजवादी कार्यकर्त्या होत्या. अण्णांचे वडील कामावरती जात असल्याने दोघा लहान भावांना सांभाळण्याची जबाबदारी अण्णांवर होती. वडीलांच्या आजारामुळे अण्णांनी वयाच्या १४ व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरवात केली. (आण्णाभाऊ मांगासाठीच्या वेगळ्या शाळेत जात) दांडपट्टा चालवणे-जंगलात भटकणे-पोहणे-मासेमारी शिकार-पक्ष्यांशी मैत्री करणे- जंगलातील पानाफुलातील फरक शोधणे असे अनेक छंद आण्णात होते.

रेड्यांच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले त्याचा परिणाम भाऊंवरती झाला व त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले. वयाच्या १९ व्या वर्षी आण्णाभाऊ वडीलांसोबत मुंबईस वास्तव्यास आले होते (दुष्काळामुळे) व मुंबईतील भायखळ्याच्या ‘चांदबीबी’ चाळीत राहू लागले, मुंबईत अण्णा तेथील राजकीय संघटन व चित्रपटांकडे आकर्षीत झाले होते. कम्युनिस्ट पक्षाची कामे करीत असतानाच त्यांच्या ‘तुकाराम’ या नावाचे ‘अण्णा’ मध्ये रूपांतर झाले. मुंबईत पोटासाठी भटकत असतांना त्यांनी घरगडी, बुटपॉलिश, डोअरकिपर, कुत्रा सांभाळणारा, खाण कामगार, सिंगबॉय, कोळसा वाहक, हॉटेल बॉय इत्यादी कामे केली. त्याकाळातच त्यांना चित्रपटांचा छंद लागला व या छंदानेच ते साक्षर झाले.

वयाच्या १७-१८ या वर्षीच कुटुंबाची जबाबदारी आली व त्यांनी गिरणी कामगार म्हणून कामाला सुरवात केली. (कोहिनूर मिल मध्ये) नंतर मील मधली नोकरी सुटल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊन ते कुंटुबासह परत आपल्या ‘वाटेगाव’ला आले. इथे गावाकडे ते फार रमले नाहीत व ते त्यांच्या नातेवाईकाच्या तमाशा फडात सामील झाले.

अण्णा भाऊ साठे क्रांतिकारक, लेखक आणि उत्कृष्ट कवी सुद्धा होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीतही त्यांनी जनजागृती केली. बाटेगावात ते चलेजाव चळवळीत बर्डे गुरुजींसोचत असल्याने त्यांच्यावर पण अटकवॉरंट निघाले. त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले. पुढे ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागले. या काळातच १९४४ साली त्यांनी लालबावटा या कलापथकाची स्थापना केली.

(शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्या सहकार्याने) अण्णा मुंबईतील ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलीत वस्तीत कम्युनिष्ट चळवळीत कार्य करू लागले. (आर.बी.मोरे, के. एम.साळवी, शंकर पगारे यांसोबत) येथेच ते लिहायला शिकले व त्यांनी पहिले गाणे ‘लेबर कॅम्प’मधील मच्छरांवर लिहीले. याच कॅम्पमध्ये त्यांनी वरील कलापथकाची स्थापना केली. (लाल बावटा) १९४५ च्या दरम्यान अण्णांचे आयुष्य मुंबईत स्थिरावले. लोकयुद्ध साप्ताहीकात वार्ताहराचे कार्य लिहीली. १९५० ते ६२ हा काळ अण्णांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. मुंबई सरकारने लालबावटा कलापथकावर बंदी घातली. तमाशावर बंदी आल्याने अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. त्यांनी ३०० पेक्षा जास्त कथा लिहिल्या.

अण्णांच्या कथा

उपकाराची फेड भारतीय समाजातील जातीतील उतरंडीमुळे चांभार, मांग, यातही कनिष्ठ श्रेष्ठ भावना वाढते याचे चित्रण त्यांच्या कथेत होते. कोंबडीचोर गरीबीमुळे माणूस चोरीस कसा मजबूर होतो याचे चित्रण, गजाआड तुरुंगात भेटलेल्या कैद्याचे चित्रण. चिरागनगरची भूतं मुंबईतील चिरागनगरीत राहत असतानाचे जीवनसंघर्षाचे चित्रण. जिवंत काडतूस १९४२ लढ्यातील सहकाऱ्याचं चित्रण. बंडवाला जमीनदाराच्या अन्यायाविरूद्ध लढणारा मांग तरूणाची कथा. बरवाजा कंजारी जात पंचायतीच्या अमानुष प्रथा. मरीआईचा गाडा अंधश्रद्धेवर. रामोशी यदू रामोशीचा जमिनदाराविरुद्ध संघर्ष. वळणसापळा- आंबेडकरांची दलित चळवळ.

१९६१ साली ‘फकिरा’ कादंबरीता महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कए त्यात त्यांनी भीषण दुष्काळातील ब्रिटीशांचे खजिने धान्य लुटुन ते गरिब दलीतात वाटणान्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण त्यात केले आहे.) अण्णांच्या ‘शाहीर’ या पुस्तकाला ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते एस. ए.डांगे यांनी प्रस्तावना लिहून अण्णांचा गौरव केला, अण्णांच्या ‘इनामदार’ नाटकास हिंदी प्रयोगासाठी कम्यु. पक्षाशी संबंधीत ‘इंडीयन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) च्या बलराज सहानी यांनी पुढाकार घेतला. (त्या नाटकात ए. के. हंगल होते) पुढे अण्णाभाऊ इप्टाचे अध्यक्षही झाले)

त्यातून त्यांनी त्यासाठी ‘तमाशा’ या महाराष्ट्रातील लोककलेचा आकृतीबंध स्विकारला. तमाशाच्या पारंपारिक सादरीकरणातील गण-गवळण बतावणी आणि वग यापैकी गण बताकणी वगनाट्य भाऊंनी स्विकारले. वगनाट्ये अकलेची गोष्ट शेटजीचं इलेक्शन, बेकायदेशीर माझी मुंबई / मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा, खापली चोर, बिलंदर बडवे, अशी बगनाट्ये भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लिहीली. ‘गरुडाला पंख, वाघला नख तशी (मुंबई) मराठी मुलखाला’ हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजले. तसेच अण्णांनी लिहलेली प्रसिद्ध छक्कड लावणीचा प्रकार ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही काव्यरचना अविस्मरणीय आहे.

हिल्या दलित साहित्य संमेलनाचे (१९५८ साली) उद्घाटक अण्णाभाऊ साठे हे अध्यक्ष होते, अण्णाभाऊ साठेंनी ३५ कादंबऱ्या १३ कथासंग्रह ८ पटकथा १ प्रवासवर्णन ३ नाटके १० पोवाडे व १४ लोकनाट्ये १२ उपहासात्मक लेख यांचे लिखाण केले. ‘चीनी जणांची मुक्तिसेवा’ हे चीनी क्रांतीवरील व ‘जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले भिमराव ही आंबेडकरांवरील गाणे गाजली. मराठीतील ग्रामीण-प्रादेशिक-दलीत साहित्यावर अण्णाभाऊंचे प्रभुत्व होते. अण्णांचे साहित्य जगातील २७ भाषांत भाषांतरीत झाले आहे. (रशियन, झेक, पोर्तुगीज, फ्रेंच इ.) रशियातील कलावंत ‘अँगले’ हे अण्णाभाऊंचे मित्र होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या मृत्यू हा दिनांक १८ जुलै १९६९ रोजी झाला. त्यांच्या मृत्युनंतर १ऑगस्ट २००२ साली त्यांचे ‘टपाल तिकिट’ प्रकाशित केले गेले प्रमोद महाजनांनी ‘महाराष्ट्राचे संत’ असा त्यांचा गौरव केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा