आज आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस

पुणे, ३० जून २०२३ : International Asteroid Day
दरवर्षी ३० जून रोजी जागतिक लघुग्रह दिवस साजरा केला जातो. १९०८ मध्ये झालेल्या Siberian Tunguska या घटनेनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी जगभरातील लोकांना लघुग्रहामुळे होणाऱ्या परिणांमाबद्दल माहिती दिली जाते. तसेच यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना लघुग्रहाबाबत माहिती दिली जाते.

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस’ म्हणजे काय ?
आंतरराष्ट्रीय लघुग्रह हा ३० जून रोजी साजरा केला जातो. लघुग्रहाच्या संकटाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी हा खास दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली, जेणेकरून लोकं ब्रम्हांडामधील या लघुग्रहांच्या बाबत माहिती करून घेऊ शकतील. डिसेंबर २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं ३० जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून घोषित केला. ३० जून ही तारीख यासाठी निवडली गेली कारण, हा दिवस पृथ्वीवरील तुंगुस्का भागाला लघुग्रह धडकल्याच्या घटनेच प्रतिक आहे.

लघुग्रह दिवस चा इतिहास आणि महत्त्व
वर्ष २०१६ डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रानं १५ फेब्रुवारी २०१३ ला रशियाच्या चेल्याबिंस्कमध्ये उल्का पडल्यानंतर, त्याबाबत शिक्षण आणि जागरूकता वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून घोषित केला. ३० जूनला संयुक्त राष्ट्र संघानं, प्रस्ताव A/RES / ७१/९० करुन आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून घोषित केला होता. जो युनियन ऑफ स्पेस एक्सप्लोररद्वारे प्रस्तावित आहे आणि बाहेरील स्पेसच्या शांतीपूर्ण उपयोगांकडून (सीओपीयूओएस) समर्थित आहे.

हा दिवस १९०८ सालच्या तुंगुस्का घटनेच्या आठवणीचं प्रतिक आहे. जेव्हा रशियाच्या सायबेरियामध्ये पॉडकमेनेया तुंगुस्का नदीच्या किनाऱ्यावरील दाट जंगलामध्ये, ३० जून १९०८ रोजी सकाळी एक जळती उल्का पडली आणि उल्कापात झाला. उल्कापात झाल्यामुळे २,१५० स्क्वेअर किलोमीटर वन परिसरातील ८ कोटी झाडं नष्ट झाली, तसेच ही घटना घडली कशी यावर,आज पण संशोधक रिसर्च करत आहेत आणि तेव्हापासून आतापर्यंत संशोधकांना याच रहस्य उलडगडता आलेलं नाही.

काय आहे एस्टॉराईड?
लघुग्रह म्हणजेच एस्टॉराईड हा एक खगोलीय पिंड आहे, जो ब्रम्हांडात अविरत फिरत असतो. आकारामध्ये ग्रहांपेक्षा लहान आणि उल्का पिंड पेक्षा एस्टॉराईड हे मोठे असतात. ते मंगळ आणि गुरूच्या क्षेत्रादरम्यान च्या लघुग्रह पट्ट्यात अधिक आढळतात. एस्टॉरॉईडला लघुग्रह म्हणूनपण ओळखलं जातं जे सूर्यमालेच्या जन्माच्या वेळी विकसित झाले नव्हते. एस्टॉरॉईडला खडकाचा उरलेला भाग म्हणून पण ओळखलं जातं आणि असे अनेक शेकडो-हजारोंच्या संख्येनं एस्टॉरॉईड असू शकतात, जे ब्रम्हांडाचं सुरुवातीचं गूढ आपल्यात घेऊन फिरतायत, जे आजही दुर्लक्षित आहेत. अनेक जण लघुग्रह म्हणजेच एस्टॉरॉईडला उल्का पिंड पण म्हणतात पण ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा