आज आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली, दि. २१ जून २०२० : कोरोनाच्या जगभरातील संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जाईल. हे प्रथमच होईल जेव्हा लोक सार्वजनिक ठिकाणा ऐवजी त्यांच्या घरी राहून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतील. आज योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधितही करतील.

हा कार्यक्रम सकाळी ६.१५ वाजता सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित केला जाईल.

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२० डिजिटल व्यासपीठावर आयोजित केला जाईल. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय म्हणजे ‘घरी योग – कुटूंबासह योग’. परदेशात स्थापन झालेल्या भारतीय मिशन, ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे जगाशीही जोडल्या जातील. लोक आपापल्या घरात योग करतील.

कोरोना संकटात, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास योग प्रभावी आहे असा सल्ला ही तज्ञांकडून देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील लोक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

आयुष मंत्रालयचे लोकांना सामील होण्यासाठी आवाहन

६ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी आयुष मंत्रालयानेही लोकांना या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयामार्फत #MyLifeMyYoga हॅशटॅग हा ट्रेंड देखील चालविला गेला आहे. लोकांना या हॅशटॅगसह व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले गेले आहे.

रेकॉर्ड, अपलोड आणि टॅग्ज : आयुष मंत्रालय

व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेबसाइट देखील सार्वजनिक केली आहे. mylifemyyoga2020.com/home येथे योग करताना लोक व्हिडिओ सामायिक देखील करू शकतात. आयुष मंत्रालय लोकांना योग करण्यास प्रोत्साहित करीत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने #IdoYogaatHome आणि #YogaDay हॅशटॅगसह लोकांनाही ट्विट करण्याची विनंती करण्यात आली आहे.

योगादिना दिवशी ३ मिनिटे योगा करतांना आपण सोशल मीडियावर व्हिडिओ सामायिक देखील करू शकता. यासाठी प्रथम योगा करून व्हिडिओ रेकॉर्ड करा, अपलोड करा आणि #mygovindia योग टॅगिंगसह #pibindia आणि #MyLifeMyYoga पोस्ट करा.

लेहमध्ये एक भव्य कार्यक्रम होणार होता

सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी आयुष मंत्रालयाने लेहमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी केली होती. आज, कोरोना विषाणूचे वाढते संकट लक्षात घेता, ते डिजिटल पद्धतीने साजरे केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ पासून साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा