आज ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन, यंदाची थीम ‘योग फॉर वेलनेस’

नवी दिल्ली, २१ जून २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी सोमवारी सकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतील. पीएम मोदी सोशल मीडियावर म्हणाले, ‘२१ जून रोजी आपण ७ वा योग दिवस साजरा करू. यंदाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ आहे, जी शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाला समर्पित असेल. सकाळी ६.३० च्या सुमारास मी योग दिन कार्यक्रमास संबोधित करेन.’

कोरोना साथीच्या आजारामुळे, संपूर्ण कार्यक्रम थेट होईल. म्हणजेच टीव्हीवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. बाहेर सामूहिक कार्यक्रम होणार नाही. सर्व दूरदर्शन वाहिन्यांवरून सकाळी साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू यांचे संबोधन आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योगा प्रदर्शनचे थेट प्रक्षेपणही असेल. परदेशातील भारतीय मिशनही यावर नजर ठेवतील. यावेळी देखील सुमारे १९० देशांमध्ये योग दिवस साजरा केला जाईल.

कोरोना साथीतील दुसरा योग दिवस

यावेळी कोरोना महामारीच्या दरम्यान दुसरा योग दिन साजरा केला जाईल. गतवर्षीच्या सुरुवातीलाही महामारीच्या दरम्यान सहावा योग दिन आयोजित करण्यात आला होता. तथापि, कोरोनामुळे तो फारसा प्रभाव राहिला नाही. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राने ‘योग फॉर हेल्थ-योग फ्रॉम होम’ ही थीम ठेवली होती. यंदाही साथीच्या रोगांचे सर्व नियम पाळत योग दिवस साजरा केला जाईल. म्हणजेच सामाजिक अंतर, मास्क आणि वारंवार हात धुण्याचे नियम पाळावे लागतील.

२०१५ मध्ये पहिला योग दिवस साजरा, दोन जागतिक विक्रम

२१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुमारे, ३५,९८५. लोकांनी सुमारे २१ वेगवेगळ्या प्रकारचे योगसन एकत्रितपणे ३५ मिनिटे नवी दिल्लीतील राजपथ येथे केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा