संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती

महाराष्ट्र ,९ ऑगस्ट २०२० : मराठी नाट्यसृष्टीतील एक श्रेष्ठ गायक-अभिनेते म्हणजेच संगीतसूर्य केशवराव भोसले. शारदा नाटकातील ‘मूर्तीमंत भीती उभी’ या पदाला आठ-आठ वेळा वन्स मोअर मिळवलं त्यावेळी त्यांच वय होत फक्त दहा वर्षे. या पदाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले. खुद्द राजर्षी शाहू महाराजांनी वन्स मोअर ची शाबासकी दिली होती.

संगीतसूर्य केशवराव भोसलें सारखा थोर कलावंत राजर्षी शाहू महाराजांनीच महाराष्ट्राला दिला वयाच्या १८ व्या वर्षी १९०८ साली ‘ललित कलादर्शन नाटक मंडळी’ ही कंपनी स्थापन केली. इ.स. १९१६ साली राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला निमंत्रित केले. कोल्हापूर दरबाराकडून केशवरावांना दहा हजार रुपये मिळाले. त्यांचा मोठा मानसन्मान करण्यात आला. मिळालेला सर्व पैसा केशवरावांनी अनेक संस्थांना देणगी रूपाने दिला. महालक्ष्मी देवीचे शिखर पाजळवण्यात आले. टाऊन हॉलमध्ये महाराज व इतर सरदार व निमंत्रितांना गार्डन पार्टी देण्यात आली. या कोल्हापूर भेटीत महाराजांनी केशवरावांकडून ‘मृच्छकटिक’ हे नाटक पॅलेस थिएटरच्या मागे एरिना बांधकाम करून घेतले. पंचवीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सर्वांसाठी मोफत खेळाचे आयोजित करण्यात आला. कोल्हापूरात दरबारासाठी महाराजांनी बरेच खेळ केले. आपल्या प्रजेसाठी त्यांच्या नाटकाचे प्रयोग भरवले होते. १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकाने त्यांनी कीर्तीचा परमोच्च बिंदू गाठला.

लहानपणी ते वयाच्या चौथ्या वर्षी स्वदेश मंडळात दाखल झाले. लहानसहान कामे ते शारदेच्या भूमिकेतील ‘मूर्तीमंत भीती उभी’ हे अजरामर झालेले पद हा प्रवास थक्क करणारा आहे. आठ-आठ वेळा या पदांना वन्स मोअर मिळाले ही काही साधी गोष्ट नक्कीच नाही.

भा. वि. वरेकरांनी आपले “कुंजविहारी” हे नाट्य शाहू छत्रपतींना अर्पण केले. त्याप्रसंगी छत्रपती त्यांना म्हणाले : ”वरेकर तुम्ही मला नाटक अर्पण केलेत यात माझा मोठा मान आहे. आता माझा केशा (केशवराव भोसले) स्वत: उभा राहिला आहे. त्याला एक नाटक लिहून द्या. राजा सोहनीही माझाच आहे. त्याचे काय ते करायलाच; पण केशवला मात्र विसरू नका. केशा म्हणजे एक तळपती तलवार आहे. ती जर हाती मिळाली तर तुम्ही जग जिंकाल.”

राजर्षी शाहू महाराजांचे हे वाक्य केशवरावांनी पुढील आयुष्यात अक्षरश: खरे करून दाखवले. केशवरावांना राजाश्रयापेक्षा लोकाश्रय हा शब्द मान्य होता; परंतु शाहू महाराजांचा राजाश्रय हा लोकाश्रयच होता. योगायोग असा की कोल्हापूरला कलेला निवाऱ्याची अडचण आहे, तिचा कोंडमारा होत आहे व तिला खुल्या दिलाने, खुल्या मानाने वावरता येत नाही, हे पाहून ज्या महाराजांनी नाटयगृह बांधले, त्याच नाटयगृहाला ना. बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने पुढे केशवराव भोसले नाटयगृह हे नाव देण्यात आले.  अशा या गुणवान, किर्तीवान गायक व अभिनेत्याला जयंती निमित्त मनाचा मुजरा

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा