आज FY2022-23 चा पहिला दिवस, होणार हे बदल, जाणून घ्या कसे मोजले जाते आर्थिक वर्ष

पुणे, 1 एप्रिल 2022: आर्थिक वर्ष 2021-22 काल संपले. गुरुवारी म्हणजेच काल या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. नवीन आर्थिक वर्ष (2022-23) आज 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाची सुरुवात खूप महत्त्वाची असते. या दिवसापासून उत्पन्न, कर आणि इतर आर्थिक अटींशी संबंधित अनेक नियम बदलतात. भारतात आर्थिक वर्ष कसे मोजले जाते आणि 1 एप्रिलपासून कोणत्या गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत ते आपण जाणून घेऊया:

1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष

जगातील प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प, ताळेबंद आणि कंपन्यांचे उत्पन्न विवरण दरवर्षी तयार केले जाते. जगातील अनेक देशांमध्ये हे एक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे मोजले जाते. पण भारतात या एका वर्षाचा हिशोब 1 एप्रिल ते 31 मार्च असा केला जातो. याला आर्थिक वर्ष म्हणतात.

जाणून घ्या असेसमेंट ईयर बद्दल

जर तुम्ही अद्याप असेसमेंट ईयरच्या गणनेकडे लक्ष दिले नसेल, तर तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हे तुम्ही उदाहरणाद्वारे समजू शकता.

जेव्हा तुम्ही 2021-22 साठी आयकर रिटर्न सबमिट करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला आयकर वेबसाइटवर असेसमेंट ईयर मध्ये 2022-23 दिसेल. कारण तुम्हाला 2022-23 मध्ये 2021-22 चे उत्पन्न आणि कर दायित्वाचा तपशील द्यावा लागेल.

1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होतात. आयकराशी संबंधित अनेक बदल 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. क्रिप्टो मालमत्ता, अद्ययावत रिटर्न भरणे, ईपीएफवरील व्याजदराशी संबंधित नवीन कर नियम, कोविड-19 च्या उपचारांवरील कर सवलत असे अनेक मोठे बदल 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा