नाशिक, १५ सप्टेंबर २०२३ : राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात विविध ८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन केंद्रीभूत पद्धतीने २७ हजार ३६० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियमित तीन आणि विषेश चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पाचव्या विषेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आज अखेरची संधी मिळणार आहे.
इयत्ता अकरावीच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त जागा असल्याने शिक्षण विभागाकडून पाचव्या विषेश फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये २१९ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत १३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर ८८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केलेले नाही.
इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिये अंतर्गत १७ हजार ७९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अद्यापही ९ हजार ५६७ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांची संख्या मोठी असल्याने अजून एका विषेश फेरी होण्याची शक्यता आहे. असे सुत्रांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर