आज मोदी करतील देशवासीयांना संबोधित

नवी दिल्ली: जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्ता पर्यंत भारतात या विष्णुने ३ बळी घेतले आहेत. त्यामुळे या विषयी चिंता आणखी वाढली आहे.

देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पर्वभुमिवर सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.

सार्क सदस्यांच्या राष्ट्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन संवाद साधताना मोदींनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून ७२ कोटींचा निधीची घोषणा केली होती. तसेच या संघटनेतील राष्ट्रांनी आपपल्या परीने निधी द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर ते भारतवासियांना कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय मंत्र देणार? तसेच एखादी मोठी घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर मोदी देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ वाजता मोदी देशवासियांना संबोधित करतील. कोरोना विषाणूचा वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करतील. तसेच देशातील एकंदरीत परिस्थितीच्या आढाव्यासंदर्भात कोणती आणखी कोणती पावले उचलण्याची गरज आहे, यावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा