मुंबई, दि. २९ जून २०२०: इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स सोमवारी सुरूवातीच्या व्यापारात ३०० अंकांनी खाली घसरला आणि जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक निर्देशांकाच्या तुलनेत इंडेक्स-हेवीवेट एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांच्या तोट्यामुळे सेन्सेक्स ३०० अंकांनी खाली आला.
३० समभागांचा (शेअर्स) निर्देशांक ३२३.९१ अंक म्हणजेच ०.९ टक्क्यांनी घसरून ३४,८४७.३६ वर, तर एनएसई निफ्टी ८३.६५ अंक म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी घसरून १०,२९९.३५ वर बंद झाला.
सेन्सेक्स याबाबतीत विचार करायचे झाले तर बजाज फायनान्स हा सर्वात जास्त घसरण असलेला समभाग ठरला आणि त्याखालोखाल अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी आणि इन्फोसिसचा क्रमांक लागला. तर आयटीसी, सन फार्मा, नेस्ले इंडिया आणि पॉवरग्रीड या कंपन्यांच्या समभागांच्या किमती वधारल्या.
मागील सत्रात बीएसईचा निर्देशांक ३२९.१७ अंक म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी वधारून ३५,१७१.२७ वर बंद झाला आणि निफ्टी ९४.१० अंकांनी म्हणजेच ०.९० टक्क्यांनी वधारत १०,३८३ वर बंद झाला.
शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते होते आणि ७३५.१८ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली जाते, असे अस्थायी विनिमय आकडेवारीत दिसून आले.
तज्ञांच्या मते जागतिक स्तरावर कोविड -१९ चा वाढता प्रभाव पाहता गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे सध्या भारत आणि चीन सीमा विवाद हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या विवादांमुळे देखील शेअर मार्केट वर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. यालाच साथ म्हणून अमेरिका आणि चीन यांचे संबंध देखील खराब होत चालले आहेत. उभय देशांमधील व्यापार युद्धामुळे देखील बाजारावर विपरित परिणाम होत आहे.
जगभरात या आजाराशी संबंधित रुग्णांची संख्या १ कोटी ओलांडली आहे आणि मृतांचा आकडा ५ लाखांवर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या ५.४८ लाखांवर पोचली आहे, तर मृतांचा आकडा १६,४७५ आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर्स १.६९ टक्क्यांनी घसरून ४०.२४ डॉलर प्रति बॅरल झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी