केनबरा, २ डिसेंबर २०२०: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्याची एकदिवसीय मालिका टीम इंडियाने गमावली आहे. बुधवारी तिसर्या आणि अंतिम सामन्यात विराट ब्रिगेड आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघाचा अनुक्रमे ६६ आणि ५१ धावांनी पराभव झाला आहे. आज हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता सुरू होईल.
केनबरामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून ०-३ क्लीन स्वीप टाळण्यासाठी मैदानावर उतरेल तर कर्णधार विराट कोहलीला मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
आयसीसी रँकिंगमध्ये जगातील पहिला क्रमांकाचा फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा येथे २३ धावा केल्या तर तो वनडे आंतरराष्ट्रीय मध्ये जलद १२,००० धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम करेल.
३२ वर्षीय विराट सर्वात कमी डावात (२४२) ही कामगिरी करणारा फलंदाज होईल. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे सोडले असून त्याने १२,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ३०० सामने खेळावे लागले. विराट कोहलीकडे आधीपासूनच वेगवान ८,०००, ९,०००, १०,००० आणि ११,००० धावा करण्याचा विक्रम आहे.
असे आहेत विराटचे विक्रम
२४ डावांमध्ये १,००० धावा
५३ डावांमध्ये २,००० धावा
७५ डावांमध्ये ३,००० धावा
९३ डावांमध्ये ४,००० धावा
११४ डावात ५,००० धावा
१३६ डावात ६,००० धावा (हाशिम आमला -१२३ दुसरा)
१६१ डावात ७,००० धावा (हाशिम अमला -१५० दुसरा)
१७५ डावात ८,००० धावा (सर्वात वेगवान)
१९४ डावांमध्ये ९,००० धावा (सर्वात वेगवान)
२०५ डावात १०,००० धावा (सर्वात वेगवान)
२२२ डावात ११,००० धावा (सर्वात वेगवान)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे